PM Kisan Samman Nidhi Yojana (पीएम किसान योजना) हा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा थेट लाभ हस्तांतरण (DBT) कार्यक्रम आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांद्वारे एकूण रुपये ६,०००/- ची आर्थिक मदत दिली जाते.
आतापर्यंत, २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला.
यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये पुढील मोठा प्रश्न – PM Kisan २२ वा हप्ता कधी येणार?
चला ताज्या माहिती व अनुमानानुसार पूर्ण अपडेट पाहूया.
Table of Contents
PM Kisan 22nd Installment Date 2026 – (संभाव्य कालावधी) :-
सरकारने अद्याप पीएम किसान योजना २२ वा हप्ताबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, मागील तीन हप्त्यांच्या Release Pattern वरून अंदाज बांधता येतो:
| Installment | Release Date |
|---|---|
| २१ वा हप्ता | १९ नोवेंबर २०२५ |
| २० वा हप्ता | जुलै २०२५ |
| १९ वा हप्ता | फेब्रुवरी २०२५ |
या अनुसार, सरकार वर्षातील तिन्ही हप्ते साधारण फेब्रुवारी – जून – नोव्हेंबर या कालावधीत देते.
PM Kisan Expected Release Date (22nd Installment):
👉 फेब्रुवरी – मार्च २०२६
(मागील चक्रानुसार ही सर्वात जास्त शक्यता)
म्हणजेच शेतकऱ्यांना २०२६ च्या पहिल्या तिमाहीत पुढील हप्ता मिळू शकतो.
पीएम किसान योजना सुरू ठेवण्यासाठी व २२ वा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी :-
1️⃣ e-KYC पूर्ण असणे आवश्यक
सरकारच्या नियमांनुसार e-KYC नसेल तर हप्ता थांबवण्यात येतो. त्यामुळ आपला e-KYC अपडेट आहे की नाही याची पुष्टी करा.
2️⃣ Aadhaar–Bank Linking योग्य असणे आवश्यक
Aadhaar mismatch किंवा inactive bank account असल्यास payment “Failed” होतो.
3️⃣ Land Records मध्ये Beneficiary चे नाव असणे आवश्यक
खातेदाराचे नाव जमिनीच्या नोंदीशी नीट जुळलेले असणे आवश्यक.
4️⃣ Mobile Number अपडेट असणे (Optional but Important)
OTP verification आणि alerts साठी अत्यावश्यक.
22nd Installment Status कसा तपासावा?
शेतकरी २२ वा हप्ता जारी झाल्यावर खालीलप्रमाणे स्टेटस पाहू शकतात:
PM Kisan Status Check Steps
1️⃣ PM Kisan Portal उघडा → https://pmkisan.gov.in
2️⃣ “Know Your Status” वर क्लिक
3️⃣ Aadhaar / Mobile / Account नंबर टाका
4️⃣ खालील मेसेजपैकी एक दिसतो:
| Status | Meaning |
|---|---|
| FTO Generated | राज्य सरकारने लाभार्थी मंजूर केला आहे; पेमेंट प्रोसेस सुरू |
| RFT Signed by State | राज्याकडून केंद्राला यादी पाठवली आहे |
| Payment Under Process | पैसे DBT प्रक्रियेत आहेत |
| Payment Failed | खाते / KYC / Aadhaar समस्या |
| Beneficiary Not Found | चुकीची माहिती / नाव जुळत नाही |