Table of Contents
⭐ Perplexity AI
आपण ChatGPT व Google gemini ह्या दोन कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणालीच नाव तर ऐकलं असणार! ऐकलंच काय तर आज प्रतेक माध्यमात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बिझनेस असो कॉर्पोरेट असो की शाळा कॉलेज. आज सार जग ChatGPT व Google gemini चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मध्यंतर आपण पाहिलं असेल की कश्या प्रकारे Google gemini चा उपयोग करून आपण दिलेल्या माहिती (Prompt) नुसार हवं तस AI generated फोटोस आपण तयार करत होतो. जणू एक ट्रेंडच सोशल मिडिया वर झळकत होता. तसेच आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) काळात “Perplexity AI” हे नाव झपाट्याने लोकप्रिय होत आहे. प्रश्न विचारणे, माहिती मिळवणे, संशोधन करणे किंवा लांब लेखांचे सारांश तयार करणे — या सर्वांसाठी Perplexity AI अत्यंत उपयुक्त साधन मानले जाते.

आता आपण Perplexity AI म्हणजे काय ? ते कसे काम करते, आणि ते ChatGPT पेक्षा कसे वेगळे आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
⭐ Perplexity AI म्हणजे काय?
Perplexity AI हे एक AI-आधारित उत्तर देणारे सर्च टूल आहे.
याला “AI Search Engine” देखील म्हणतात.
हे साधन इंटरनेटवरील अनेक माहिती स्रोत स्कॅन करून, त्यातील अचूक डेटा काढून, वापरकर्त्याला सोप्या भाषेत आणि संदर्भांसह उत्तर व माहिती देते.
Perplexity AI = Google + ChatGPT यांचे मिश्रण :-
- माहिती इंटरनेटवरून रिअल टाइम/वास्तविक वेळेत घेते.
- तसंच उत्तरांसोबत Source links देते.
- प्रश्नांवर आधारित संशोधन-स्तरीय तपशील पुरवते.
- लेख, सारांश, कोड, विश्लेषण, डेटा इत्यादी तयार करते.(कोडर्स विद्यार्थी, डेटा यूजर व डेटा सायंटिस्ट यांसाठी सोल्यूशन्स शोधण्यासाठी खूप उपयुक्त.
⭐Perplexity AI चे निर्माते कोण आहेत?
Perplexity AI ही अमेरिकेतील एक खाजगी सॉफ्टवेअर कंपनी Perplexity AI Inc. नावाने २०२२ ला स्थापन झाली. अरविंद श्रीनिवास (Aravind Srinivas), देनिस यारात्स (Denis Yarats), जॉनी हो (Johnny Ho) व एंडी ज़ेंग (Andy Zeng) हे कंपनी चे सह-संस्थापक व मुख्य निर्माते आहेत.
तसेच Perplexity AI ला जगभरातील मोठ्या टेक-नेत्यांकडून मोठी गुंतवणूक ही मिळाली आहे त्यात :-
- Jeff Bezos
- Nvidia
- Andreessen Horowitz
- Databricks
- आणि इतर नामांकित AI गुंतवणूकदार आहेत.
⭐ Perplexity AI कशासाठी वापरता येते?
- माहिती शोधणे
- सरकारी योजना / डेटा शोधणे
- अभ्यासासाठी रिसर्च
- Tech / Coding सोल्यूशन्स
- ब्लॉग / रिपोर्ट तयार करणे
- न्यूज सारांश
- Fact-checking
- AI-based लेखन
🔧 Perplexity AI कसे काम करते?
Perplexity AI खालील गोष्टी एकत्र वापरते:
- Large Language Models (LLMs) — GPT-4, Mixtral, Perplexity चे स्वतःचे मॉडेल
- Real-Time इंटरनेट शोध
- Citation-based उत्तर प्रणाली
- AI reasoning (तर्कसंगत विश्लेषण)
⚙️ काम करण्याची प्रक्रिया:
1️⃣ वापरकर्ता प्रश्न विचारतो
2️⃣ Perplexity AI इंटरनेटवर शोध घेते
3️⃣ विश्वासार्ह स्रोतांमधून माहिती गोळा करते
4️⃣ संक्षिप्त + अचूक + तर्कसंगत उत्तर देते
5️⃣ शेवटी sources / references देऊन उत्तराची पुष्टी करते.
⭐ Perplexity AI कसे वापरावे?
🌐 वेबसाइट: https://www.perplexity.ai
(फ्री + पेड दोन्ही आवृत्त्या मध्ये उपलब्ध)
तसंच Android / iOS वर ही उपलब्ध आहे

जर तुम्ही एयरटेल सिमकार्ड यूजर असाल तर तुम्हाला Perplexity AI च Pro subscription १२ महिन्या करिता मोफत मिळणार आहे त्या साठी तुम्हाला Airtel Thanks App डाउनलोड करून – Claim your OTTs & More सेक्शन वर क्लिक करून – Claim Now करा. तुम्हाला तुमचं एक वर्षाच Perplexity AI च Pro subscription मिळून जाईल.

FAQ :-
Perplexity AI म्हणजे काय?
Perplexity AI हे एक AI-आधारित शोध साधन (AI search engine) आहे जे वापरकर्त्यांना रिअल-टाइम माहिती, संक्षिप्त उत्तरं आणि संदर्भ (citations) देतं. हे Google search आणि AI chatbot यांचे मिश्रण म्हणून काम करते.
Perplexity AI मोफत वापरता येते का?
होय, Perplexity AI चे बेसिक फीचर्स मोफत उपलब्ध आहेत. मात्र, अधिक प्रगत फिचर्ससाठी Pro version देखील उपलब्ध आहे.
Perplexity AI आणि ChatGPT मध्ये काय फरक आहे?
ChatGPT मुख्यतः संवादात्मक AI आहे, तर Perplexity AI हे real-time इंटरनेटवरून माहिती आणून reference-based उत्तरं देते. Perplexity AI तथ्य-आधारित प्रश्नांमध्ये अधिक अचूक माहिती देऊ शकते.
Perplexity AI सुरक्षित आहे का?
होय, हे सुरक्षित आहे. तरीही संवेदनशील वैयक्तिक माहिती (जसे की PAN, Aadhaar, Passwords, Bank details) कधीही कोणत्याही AI tool वर टाकू नये.
Perplexity AI द्वारे real-time माहिती मिळते का?
होय, Perplexity AI इंटरनेटवरून रिअल-टाइम माहिती स्कॅन करून ताजी डेटा, अपडेट्स आणि संदर्भ असलेली उत्तरं देतं.
🏁 निष्कर्ष
Perplexity AI हे अत्याधुनिक, वेगवान आणि विश्वसनीय AI-आधारित शोध साधन आहे.
माहिती गोळा करण्यासाठी, संशोधनासाठी आणि विश्वासार्ह उत्तरे मिळवण्यासाठी हे आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट AI Research Assistant म्हणून ओळखले जाते.