महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली “माझी लाडकी बहीण योजना ” ही राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात लाभ दिली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १५००/- ची थेट आर्थिक मदत (DBT – Direct Benefit Transfer) द्वारे महिलांच्या बँक खात्यात दिली जाते.
Table of Contents
🟧 लाडकी बहिण योजनेची पात्रता :-
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:
- वय २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २ .५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
- बँक खाते Aadhaar-linked असावे.
- राज्यातील महिला विवाहित/अविवाहित/विधवा/घटस्फोटित/परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला – पात्र.
🟧 लाडकी बहिण योजनेची अपात्रता :-
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जे Income tax Return फाईल करतात
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
🟧 लाडकी बहिण योजनेचे फायदे :-
- राज्यातील महिलां व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे.
- महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य.
- राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करण.
- शैक्षणिक, आरोग्य, कौटुंबिक खर्चासाठी मदत.
🟧 लाडकी बहिण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड (अर्ज भरतेवेळी आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
- बँक पासबुक / खाते विवरण Aadhaar-linked असणे आवश्यक
- उत्पन्न प्रमाणपत्र (पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्रची आवश्यकता नाही.)
- शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- महिला नवविवाहित असेल व रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
- जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र (प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
- पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र (वेबसाईट वर उपलब्ध आहे तेथून डाऊनलोड करू शकता)
- अर्जदाराचा फोटो
🟧 लाडकी बहिण योजना अर्ज कस करावा ? :-
- लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकता.
- तसेच माझी लाडकी बहीण योजने चा अर्ज “Narishakti Doot” या अधिकृत मोबाईल अॅप डाऊनलोड करून ही करू शकता.
ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
🟧 लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Step-by-Step) :-
Step १ : अधिकृत वेबसाइटला भेट द्या 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in
Step २ : “नवीन अर्ज” / “New Registration” निवडा
Step ३ : Aadhaar नंबर भरा – OTP द्वारे सत्यापन करा
Step ४ : वैयक्तिक माहिती भरा – माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरा.
- अर्जदाराचे नाव
- जन्मदिनांक
- पत्ता
Step ५ : बँक खात्याची माहिती भरा – बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरा.
- Account Number
- IFSC Code
- Bank Name
Step ६ : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
Step ७ : अर्ज सबमिट करा
🟧 Ladki Bahin Yojana e-KYC :-
महाराष्ट्र सरकारची “माझी लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana) २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला रु. १५००/- ची थेट आर्थिक मदत (DBT – Direct Benefit Transfer) द्वारे महिलांच्या बँक खात्यात दिली जाते.
परंतु २०२५ मध्ये सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची शर्त/अपडेट – e-KYC (ई-केवाईसी) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि ते ही योजना सुरू ठेवू इच्छिता त्यांना e-KYC करण अनिर्वाय आहे जर e-KYC केले नाही, तर तुम्हाला मिळणारी मदत बंद होण्याची संभावना आहे.
या लेखात आपण पाहू की e-KYC म्हणजे काय ?, का आवश्यक आहे ?, कशी करावी ?, आणि २०२५ साठी काय अपडेट आहेत ते :
🟧 e-KYC म्हणजे काय ? :-
e-KYC म्हणजे Electronic Know Your Customer — याचा अर्थ लाभार्थीची ओळख (Aadhaar), बँक खाते, उत्पन्न स्थिती इत्यादी डिजिटल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून तपासणे.
🟧 e-KYC का अनिवार्य आहे ? :-
- फसवणूक टाळण्यासाठी
- Duplicate अर्ज रोखण्यासाठी
- खऱ्या पात्र महिलांनाच लाभ देण्यासाठी
- DBT पेमेंट अचूकपणे करण्यासाठी
🟧 २०२५ मधील e-KYC अपडेट आणि वेळमर्यादा :-
- लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी आधी १८ नोव्हेंबर होती, त्यामुळे ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे ई-केवायसी करता आले नव्हते, त्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत संधी आहे.
- तसेच अयोग्य किंवा अपूर्ण तपासणी झालेल्या लाभार्थींची मदत रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- नवीन नियम (आय प्रमाणपत्र): ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी आय प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
🟧 लाडकी बहिण योजना e-KYC कशी करावी ? (Step-by-Step) :-
Step १ : अधिकृत वेबसाइटला भेट द्या 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in
Step २ : लाभार्थी “आधार क्रमांक” टाका
Step ३ : बाजूला दिलेला “कॅप्चा कोड” टाका
Step ४ : आधार प्रमाणीकरणासाठी संमती – “मी सहमत आहे” बॉक्स वर क्लिक करा.
Step ५ : “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा.
Step ६: तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर वर OTP येईल तो व्यवस्थित टाकून सबमिट करा.

Step ७: त्यानंतर तुमच्या समोर नवीन विंडो ओपेन होईल त्यात तुमची अचूक माहिती भरा.

- वडिलांचे/पतीचे नाव टाका
- तुमची जात प्रवर्ग निवडा
- माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम /मंडल/भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत नाही. – “होय” किवा “नाही” पर्याय निवडा.
- माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. – “होय” किवा “नाही” पर्याय निवडा.
- त्यानंतर खाली चेक बॉक्स वर क्लिक करून सबमिट करा.
Submit केल्यानंतर तुम्हाला “ई-केवाईसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे”. यशस्वी संदेश (Success Message) दिसेल.

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (e-KYC संदर्भात)
e-KYC करायचं नसेल — तरी मदत मिळेल का?
नाही — e-KYC पूर्ण न केल्यास पुढील मदतीचे हप्ते थांबवले जाऊ शकतात.
अंतिम दिनांक पुन्हा वाढेल का?
सध्या 31 डिसेंबर 2025 अंतिम तारीख आहे. त्यानंतर कोणतीही अधिक वेळ देण्याची अधिकृत घोषणा नाही.
ऑनलाइन e-KYC शक्य नसेल तर काय?
काही विभागांमध्ये offline / District-office द्वारेही सत्यापन करण्याची व्यवस्था आहे. स्थानिक Women & Child Welfare कार्यालयात संपर्क करा.
मोबाईल OTP येत नसेल तर काय करावे?
तुमचा मोबाईल Aadhaar-linked आहे का ते तपासा.
🟧 निष्कर्ष :-
“माझी लाडकी बहीण योजना + e-KYC 2025” हे राज्यातील गरीब, अल्प उत्पन्न असलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे — जे त्यांना मासिक आर्थिक मदत देते आणि त्यांचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करते.
तुम्ही जर पात्र असाल आणि अद्याप e-KYC केले नसेल, तर आता लगेच करा. कारण ३१ डिसेंबर २०२५ नंतर मदतीचा लाभ थांबवला जाऊ शकतो.
ही माहिती वाचून, कुटुंबातील इतर महिलांना देखील सांगा — योग्य व्यक्तींना नक्की मदत मिळावी.