२०२६ मध्ये प्रत्येक मराठी व्यक्तीला माहित असावे लागणारे ५ फ्री AI टूल्स! (आता तंत्रज्ञान झाले सोपे)

Spread the love

‘मराठी डिजिटल वर्ल्ड’ (MarathiDigitalWorld.com) वर तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत.

आज जग वेगाने बदलत आहे. २०२६ मध्ये ‘AI’ (Artificial Intelligence) आपल्या आयुष्याचा भाग बनले आहे. म्हणूनच, आजच्या लेखात मी तुम्हाला अशा ५ फ्री AI टूल्स बद्दल सांगणार आहे, जे प्रत्येक मराठी व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे. हे टूल्स तुमचे काम सोपे करतील आणि तुम्हाला स्मार्ट बनवतील.

१. चॅटजीपीटी (ChatGPT) आणि जेमिनी (Gemini): तुमचा पर्सनल असिस्टंट :-

आता इंग्रजीमध्ये ईमेल लिहायचा असेल, रजेचा अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या नवीन विषयाची माहिती हवी असेल, तर कोणालाही विचारण्याची गरज नाही.

फायदा:

  • तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता
  • लेख, ब्लॉग, ईमेल तयार करू शकता
  • कोडिंग / अभ्यास / माहिती शोधू शकता
  • तुम्ही मराठीत देखील बोलू शकता Gemini किंवा ‘ChatGPT मराठीत प्रश्न विचारला तरी ही टूल्स तुम्हाला अगदी अचूक उत्तर देतात.

गुगलवर जाऊन ‘Gemini‘ किंवा ‘ChatGPT‘ सर्च करा आणि लॉग-इन करून गप्पा मारायला सुरुवात करा.

२०२६ ची ५ फ्री AI टूल्स मराठी डिजिटल वर्ल्ड
२०२६ ची ५ फ्री AI टूल्स मराठी डिजिटल वर्ल्ड

२. कॅनव्हा AI (Canva Magic Media): एका मिनिटात सुंदर फोटो तयार करा :-

५ फ्री AI टूल्स मधील कॅनव्हा आई हा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी किंवा सणांच्या शुभेच्छांसाठी फोटो हवा आहे का?

  • काय खास आहे? तुम्हाला फक्त टाईप करायचे आहे, जसे की- “पावसात भिजणारा एक छोटा मुलगा” आणि हे AI टूल तुम्हाला तसा फोटो तयार करून देईल.
  • मराठी बांधवांसाठी: आता सणासुदीचे शुभेच्छा संदेश स्वतः तयार करा आणि व्हॉट्सॲपवर शेअर करा!

३. प्लॅन्टिक्स (Plantix): शेतकऱ्यांचा डिजिटल डॉक्टर :-

महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी प्लॅन्टिक्स AI हे एक वरदान आहे.

  • वापर: तुमच्या पिकावर कोणतीही कीड किंवा रोग पडला असेल, तर फक्त या ॲपमधून त्या झाडाचा फोटो काढा.
  • निकाल: हे AI टूल तुम्हाला लगेच सांगेल की तो कोणता रोग आहे आणि त्यावर कोणते औषध फवारावे. तेही आपल्या मराठी भाषेत!

Photo Credit : plantix.net/

हे ॲप Android आणि iOS या दोघांवर उपलब्ध आहे.

४. सॉक्रॅटिक (Socratic by Google): विद्यार्थ्यांचा ट्युशन टीचर

५ फ्री AI टूल्स मधील सॉक्रॅटिक हा ॲप तुम्हाला अभ्यास करताना एखादे गणिताचे उदाहरण सुटत नसेल किंवा विज्ञानाचा प्रयोग समजत नसेल, तर सॉक्रॅटिक ॲप तुम्हाला उत्तर देण्यास मदत करेते.

  • फायदा: पुस्तकातील प्रश्नाचा फोटो काढा आणि हे AI तुम्हाला त्याचे स्टेप-बाय-स्टेप स्पष्टीकरण देईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.

५. गुगल लेन्स (Google Lens): जगाचा अनुवादक :-

हे तुमच्या फोनमध्ये आधीच असते, पण आपण वापरत नाही.

  • वापर: जर तुम्हाला इंग्रजीतील एखादे बोर्ड किंवा कागद वाचता येत नसेल, तर गुगल लेन्सने त्याचा फोटो काढा. हे टूल काही सेकंदात त्या इंग्रजी मजकुराचे मराठीत भाषांतर करून देते.
सर्वोत्तम फ्री AI टूल्स मराठी डिजिटल वर्ल्ड

निष्कर्ष (Conclusion):-

मित्रांनो, तंत्रज्ञान हे आपल्याला मदत करण्यासाठी आहे, आपल्याला घाबरवण्यासाठी नाही. जर आपण वेळेनुसार बदललो नाही, तर आपण मागे राहू. ‘मराठी डिजिटल वर्ल्ड’चा उद्देशच हा आहे की, नवीन तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे.

तुम्हाला या ५ फ्री AI टूल्स पैकी कोणते टूल सर्वात जास्त आवडले? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा!

पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विषयासह!

Leave a Comment